Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मॅरेथॉनसाठी तयारी करताना पोलिसाचा मृत्यू

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताज हॉटेलमध्ये लढा देणाऱ्या राष्ष्ट्रपती पदक विजेत्या पोलिसाचा शुक्रवारी आकस्मिक मृत्यू झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन काकडे (४२) हे मरीन ड्राइव्ह येथे धावताना अचानक कोसळले. काकडे उत्तम धावपट्टू असून जानेवारीत होऊ घातलेल्या मुंबई मॅरेथॉनची तयारी करत होते. त्यांच्या मृत्यूमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उपस्थित होते. पोलिस उपयुक्त परिमंडळ दोन येथील कार्यालयात सध्या काकडे नेमणुकीला होते. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासह ते ताज हॉटेलमध्ये शिरले होते. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आले होते.

मूळचे पुणे येथील सासवडचे असलेले नितीन काकडे मनमिळाऊ आणि प्रामाणिक अधिकारी होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. काकडे यांना धावण्याची आवड होती. मुंबई मॅरेथॉनमध्ये २१ किलोमीटरचे अंतरही त्यांनी यशस्वीरीत्या पार केले होते.