मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... Live अपडेट्स: >> आदरणीय बाळासाहेबांची आज खूप आठवण येतेय: सुप्रिया सुळे >>उद्धव ठाकरे मुख्यंत्रिपदाची जबाबदारी योग्य पद्धतीनं सांभाळतील: मनोहर जोशी >> उद्धव आणि राज एकत्र आले तर आनंदच होईल: मनोहर जोशी >> उद्धवचा शपथविधी पाहायला बाळासाहेब नाही याची खंत: मनोहर जोशी >> विधानसभेत विरोधी पक्षच दिसत नसल्याचं विधान करणाऱ्यांवर आज विरोधात बसायची वेळ: बाळासाहेब थोरात >> उपमुख्यमंत्रीबाबत कोणताही संभ्रम नाही, तिन्ही पक्ष मिळून काम करणार: बाळासाहेब थोरात >> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शिवतिर्थावर पोहोचले; तयारीचा आढावा घेणार >> अजित पवरांना काय पद दिलं जाईल याचा निर्णय शरद पवार घेणार: संजय राऊत >> उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला जाण्याबाबत अजून कोणताही निर्णय नाही : सोनिया गांधी >>'हाउज द जोश'... संजय राऊत यांचं नवं ट्विट >> उद्धव आणि राज यांनी वैयक्तिक संबंध नेहमीच जपले: दिवाकर रावते >> बाळासाहेबांना मुलाचं कौतुक वाटलं असतं: दिवाकर रावते >> सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या >> उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दादारमध्ये झळकले पोस्टर्स >> मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार >> उद्धव ठाकरेंनी दिला 'सामना'च्या संपादकपदाचा राजीनामा >> राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रिपद, काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद व राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभा उपाध्यक्षपद असे सरकारमधील प्रमुख पदांचे वाटप >> मुंबई: राज्य मंत्रिमंडळ शपथविधीसाठी काँग्रेसकडून अद्याप नावे जाहीर नाहीत >> मुंबई: शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ घेणार मंत्रिपदाची शपथ >> शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ घेणार
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2OQ2X5B
via IFTTT