Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भारतीय जनता पक्षाने एकमताने पक्षाचे गटनेते यांची नियुक्ती केली. आज विधानसभेच्या सत्रात अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या नियुक्तीची घोषणा केली. भारतीय जनता पक्षाने आपणाकडे पक्षाचे विधीमंडळ पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून एकमताने निवड केली असल्याचे पत्र दिले, अशी माहिती पटोले यांनी सभागृहाला दिली आणि फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड जाहीर केली. फडणवीस यांच्या नियुक्तीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यांनी या प्रस्तावावेळी भाषणही केलं. त्यानंतर सभागृहातील नेत्यांनी फडणवीस यांचे अभिनंदन केले. विरोधातही माझा मित्रच: ठाकरे 'आपण तर गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत. विरोधी पक्ष सोबत आलेत. या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केलं. देवेंद्र फडणवीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर उद्धव यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, त्यावेळी ते बोलत होते.