Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चालू घडामोडी (१० डिसेंबर 2019) - Chalu Ghadamodi



दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी मिस युनिव्हर्स :

  • जगभरातील 90 देशांच्या प्रतिनिधींमधून मिस युनिव्हर्स म्हणून दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी टुंझी हिची निवड करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व स्टिव्ह हार्वे यांनी टायलर पेर्री स्टुडिओ येथे झालेल्या स्पर्धेत 26 वर्षीय टुंझी ही मिस युनिव्हर्स झाल्याचे जाहीर केले.
  • तर 2018 ची मिस युनिव्हर्स फिलिपाइन्सची कॅट्रिओना ग्रे हिने टुंझीला मुकुट परिधान केला.
  • भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ‘मिस इंडिया’ वर्तिका सिंग हिने पहिल्या 20 जणांमध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
  • तर मिस पोटरे रिको मॅडिसन अँडरसन ही द्वितीय तर मिस मेक्सिकन अ‍ॅश्ली अल्वीड्रेज हिने तृतीय स्थान पटकावले.
  • पहिल्या पाच जणींमध्ये कोलंबिया आणि थायलंडच्या स्पर्धकांनी स्थान निश्चित केले.


भारती एअरटेल परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर:


  • देशातील मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल आता परदेशी कंपनी बनण्याच्या मार्गावर आहे.
  • भारती एअरटेलची प्रमोटर भारती टेलिकॉमनं 4 हजार 900 कोटी रूपयांच्या परदेशी गुंतवणुकीसाठी दूरसंचार विभागाची परवानगी मागितली आहे. दूरसंचार विभागाकडून कंपनीला परवानगी मिळाल्यास भारती एअरटेल ही परदेशी दूरसंचार कंपनी बनणार आहे.
  • तर असं झाल्यास भारती टेलिकॉममध्ये परदेशी शेअरहोल्डिंग 50 टक्क्यांपेक्षा अधिक होणार आहे.
  • अहवालानुसार, भारती टेलिकॉमने सिंगापूरच्या सिंगटेल आणि इतर काही परदेशी कंपन्यांकडून गुंतवणूक वाढवण्यासाठी मंजुरीसाठी अर्ज केला आहे. दूरसंचार विभागाकडून याच महिन्यात भारती एअरटेलला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी दूरसंचार विभागानं भारती एअरटेलचा अर्ज नामंजुर केला आहे.



नागरिकत्व विधेयक लोकसभेत मंजूर :


  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आठ तासांच्या वादळी चर्चेनंतर सोमवारी मध्यरात्री लोकसभेत मंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 311 तर विरोधात 80 मते पडली. आता राज्यसभेत हे विधेयक मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.
  • तर हे विधेयक पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्य समाजासंबंधी आहे. पाकिस्तानमध्ये मुस्लिम अल्पसंख्य नाहीत. म्यानमार हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून तेथील रोहिंग्या बांगलादेशातून येतात. त्यांना कधीही निर्वासित म्हणून स्वीकारले जाणार नाही.
  • तसेच संविधानातील अनुच्छेद 14 मध्ये समाविष्ट असलेल्या समान हक्कांचे या दुरुस्ती विधेयकामुळे उल्लंघन होत नाही. त्यामुळे हे विधेयक संसदेत मांडणे अवैध ठरत नाही, असे स्पष्टीकरण अमित शहा यांनी दिले.
  • 1959 मध्ये नेहरू-लियाकत यांच्यातील करारनुसार, त्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण होणे अपेक्षित होते.
  • तर या विधेयकामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीनच शेजारी देशांतील अल्पसंख्याक व्यक्तींना नागरिकत्व दिले जाणार आहे. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही. धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे संविधानविरोधी असल्याचा युक्तिवाद विरोधी पक्षांतील वक्त्यांनी केला.

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धात पदकांच्या त्रिशतकाकडे भारताची वाटचाल :

  • काठमांडू (नेपाळ) येथे सुरू असलेल्या 21व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी भारताने निर्विवाद वर्चस्वाची मालिका कायम राखताना पदकांच्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
  • सोमवारी भारताने 27 सुवर्ण, 12 रौप्य आणि 3 कांस्यपदकांसह एकूण 42 पदकांची कमाठी केली.
  • तर त्यामुळे भारताच्या खात्यावर 159 सुवर्ण, 91 रौप्य, 44 कांस्य पदकांसह एकूण 294 पदके जमा आहेत.
दिनविशेष:

  • 10 डिसेंबर हा दिवस ‘मानवी हक्क दिन’ म्हणून पाळला जातो.
  • सन 1901 मध्ये नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
  • संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग सन 1916 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ ‘प्रा. अमर्त्य सेन‘ यांना प्रदान झाला.
कलची घडामोडी : (9  डिसेंबर 2019)