पुन्हा एकदा सलमान झाला मामा, अर्पिताने दिला मुलीला जन्म
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आज त्याचा ५४ वा वाढदिवस साजरा करत आहे. फक्त सिनेसृष्टीतूनच नाही तर जगभरातून सलमावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण आजचा वाढदिवस सलमानसाठी फार खास आहे. आजच्या दिवशी संपूर्ण खान कुटुंब डबल सेलिब्रेशन करणार आहे. याचं पहिलं कारण म्हणजे भाईजानचा ५४ वा वाढदिवस आणि दुसरं कारण म्हणजे सलमानची बहीण अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलीला जन्म दिला.
स्वतः अर्पिताने भावाला त्याच्या वाढदिवसाला अनोखी भेट देण्याचं आधीच ठरवलं होतं. सध्या अर्पिता हिंदूजा रुग्णालयात दाखल आहे. अर्पिताच्या प्रसूतीवेळी संपूर्ण खान कुटुंब रुग्णालयात उपस्थित होतं. रिपोर्टनुसार अर्पिताने मुलीला सी-सेक्शनने जन्म दिला. अर्पिताने सोशल मीडियावर ही गूड न्यूज शेअर करत मुलीचं नावही सांगितलं. अर्पिताने लिहिले की,
अभिनेता सलमान खानचे 'दबंग' डायलॉग्स
