बीड :- संविधान बचाव महासभेसाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक छत्रपती संभाजी महाराज मैदानात एकवटल्याचे आज दिसून आले. सीएए सह एनआरसी कायद्याविरोधात आक्रोश व्यक्त करत इन्कलाब झिंदाबादचे नारे देत एनआरसीविरोधात नागरिकांनी हल्लाबोल केला. भारतीय जनता पार्टीचे देशातील सरकार आणि मोदी-शहा ही जोडगोळी देशात अस्थिरता निर्माण करत मनुस्मृतीच्या आधारावर पुन्हा देशात छूत-अछूत आणू पाहत असल्याने त्या पद्धतीचा आणि लोकांच्या संतापाचा जणू आज बांध फुटल्याचे शहरात दिसून आले.
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली
या महासभेसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, मौलाना अबू तालिब रहेमानी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी नेता दिपा, आ. संदीप क्षीरसागर, माजी आमदार
हे पण वाचा : - बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या
अमरसिंह पंडित, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आ. राजेंद्र जगताप, माजी आ. सुनिल धांडे, माजी आ. सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, माजी आ. सिराजोद्दन देशमुख, सुशिलाताई मोराळे, कॉ. नामदेव चव्हाण, मोईन मास्टर, राजेश घोडे, अशोक हिंगे सह आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा : - मराठवाडा दुष्काळमुक्तीचा नारा देत पंकजांचं उपोषण सुरू
