Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लंगडी खेळताना आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू



Sponsored Ad  ऐकु कमी येत असेल तर श्रवयंत्र वापरा 9657588677


पिंपरी: शाळेत लंगडी खेळताना आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गुरुवारी (३० जानेवारी) सकाळी चिखली येथे ही घटना घडली. अंकिता गजानंद डोणे (वय ८, रा. जाधववाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता ही चिखली येथील अभिनव विद्यालयात दुसरी 


हे पण वाचा : -विष प्राशन केल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
इयत्तेच्या वर्गात शिक्षण घेत होती. सकाळी अकराच्या सुमारास शाळेत पीटीच्या तासाला अंकिता व शाळेतील विद्यार्थी लंगडी खेळत होते. लंगडी खेळत असताना अंकिता अचानक जमिनीवर पडली. शिक्षकांनी अंकिताला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंकिताचे वडील लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत. 

हे पण वाचा : - मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदाने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला
ते मूळचे परळी वैजनाथ येथील आहेत. अंकिताच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सायंकाळी याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अंकिता हिच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. कुटुंबिय अंत्यसंस्कारानंतर आल्यानंतर याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले.