Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

न.प.च्या कर्मचार्‍यांना पदोन्नती द्या: अन्यथा २६ जानेवारीला आमरण उपोषण


बीड :- बीड नगर परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांनी १२ वर्षे नियमीत सेवा पूर्ण झालेली आहे. त्याबद्दल त्यांना कालबद्ध पदोन्नती लागू करावी व २४ वर्षे सेवा पूर्ण करणार्‍या कर्मचार्‍यांना आश्वासीत प्रगती योजना पदोन्नती लागू करावी यासंदर्भात महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी संघटनेने वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. २०१८ ला या संदर्भात न.प.ने ठरावही घेतलेला आहे मात्र अद्यापही कोणत्याच कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे २६ जानेवारीच्या पूर्वी कर्मचार्‍यांना पदोन्नती द्यावी अन्यथा २६ जानेवारीला आमरण उपाषण करणार असल्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

   प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्मचार्‍यांना नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पदोन्नती लागू होते. तर २४ वर्षे पूर्ण सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना आश्वासीत प्रगती योजना लागू होत आहे. मात्र बीड नगर पालिकेने कर्मचार्‍यांना पदोन्नती लागू केलेली नाही. तसेच आजपर्यंतच्या सर्व थकीत डी.ए. वाढीची व फरकाची रक्कम देण्यात आलेली नाही ती तात्काळ द्यावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य नगर पालिका कर्मचारी संघटनेने मुख्याधिकारी यांच्याकडे दिले आहे. २६ जानेवारीच्या पूर्वी मागण्या मान्य न झाल्यास २६ जानेवारीला आमरण उपोषण करण्याचा इशारा अनिल राऊत, गोविंद पुरोहित, शेख बशीर, विष्णू गायकवाड, ए.एस. धांडे, शेख  राऊफ, किरण पांडे, जोगदंड यांच्यासह आदींनी दिला आहे.




रिपोर्टर