मोफत कानाची श्रवण तपसणी शिबीर 26 - 31 jan
फोन. 0241-242-4344; 9657588677
हे पण वाचा : - बीड :- शहरातील फुलाईनगर भागाच्या हद्दीत असलेल्या काळे यांच्या मळ्यातील विहिरीमध्ये रात्री दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली
हे पण वाचा : - शिक्षकाने १२ वी सायन्सच्या विद्यार्थिनीकडे केली से-क्सची मागणी !
शिवसेनेला पाण्यात पाहणारे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची रणनीती आज महाअधिवेशनाच्या निमित्ताने ठरवण्यास सुरुवात केली. शिवसेनेने तिकडे राष्ट्रवादी-कॉंग्रेस सोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन केल्यानंतर मनसेने इकडे भाजपसोबत जवळीकता वाढवली. आज महाअधिवेशनाच्या निमित्ताने ‘नवा झेंडा नवा अजेंडा’ चा नारा देत मनसेने अनेक बदल करून घेतले आहे. आज सकाळी अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर राज
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
ठाकरे यांनी नव्या ध्वजाचे अनावरण केले. मनसेच्या नव्या झेंड्यात भगव्या रंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वज यापुढे मनसेचा राहणार असल्याचे सांगितले. मनसे स्थापनेनंतर तब्बल १४ वर्षांनी मनसेच्या ध्वजाचा रंग आणि राजकारण दोन्हीही बदलले आहेत. या आधीच्या झेंड्यात चार रंग होते, मध्यभागी भगवा रंग अधिक प्रमाणात होता मात्र आता पूर्ण भगवा ध्वज समोर आणला आहे. मनसेच्या व्यासपीठावर आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा दिसून आली त्यामुळे मनसे प्रखर हिंदूत्वाकडे वाटचाल करणार हे स्पष्ट झाले.
त्याचबरोबर राज यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचीही लॉंचिंग करण्यात आली असून त्यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी राज ठाकरे महाअधिवेशनाच्या निमित्ताने मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. राज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

