Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदाने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला



अभिनेत्री प्राजक्ता माळीविरुद्धचा खटला रद्द

मुंबई- मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदाने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला होता. मात्र यात कोणतेही तथ्य नसून न्यायालयीन आदेशात कायदेशीर त्रुटी असल्याचे स्पष्ट करत हा खटला रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातून प्राजक्ता माळीला क्लीनचिट मिळाली आहे. 


हे पण वाचा : -विष प्राशन केल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
कनिष्ठ न्यायलयाच्या आदेशा विरुद्ध प्राजक्ता माळीच्या वकिलांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, ठाणे जिल्हा सत्र न्यालालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून प्राजक्ता माळीविरुद्ध असलेल्या तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट करत, न्यायालयाने दिलेल्या आदेशात कायदेशीर त्रूटी असल्याचे सांगितले. अखेर, प्राजक्ता विरुद्ध दाखल करण्यात आलेला सदर 


हे पण वाचा : - बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकर्‍यांच्या आत्महत्या
खटला रद्द करण्यात आला. हा संपूर्ण सदर खटला प्राजक्ताच्या बाजूने वकील अभिषेक अवचट व प्रताप परदेशी यांनी लढवला होता. तसेच सदर खटल्यात प्राजक्ता माळीची जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन बदनामी केल्याच्या प्रकरणाबद्दल फिर्यादी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या विचारात प्राजक्ताचे वकील आहेत.


Sponsored Ad  ऐकु कमी येत असेल तर श्रवयंत्र वापरा 9657588677