Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुठल्याच गडावरून राजकारण होणार नाही-ना.मुंडे भगवानगडावर ना.मुंडेंचं जंगी स्वागताची तयारी



नारायणगड/भगवानगड :- उतणार नाही..मातणार नाही..घेतला वसा टाकणार नाही...असा शब्द देत सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे आज नारायणगडावर नगद नारायण महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. यापूढे भगवानगडावरूनच काय..कुठल्याच गडावरून राजकारण होणार नसल्याचे धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले. नारायणगडाचा विकास करणार असल्याचे सांगून विकास कामाच्या शुभारंभाला अजित पवारांना नारायणगडावर आणणार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले. राज्याच्या मंत्रीमंडळात समाविष्ट झाल्यानंतर प्रथमच धनंजय मुंडे आज नारायणगडावर आले. यावेळी त्यांच्यासमवेत आ.प्रकाश सोळंके, आ.संदिप क्षीरसागर, आ.बाळासाहेब आजबे, माजी आ.अमरसिंह पंडित यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. नारायणगडावर नगद नारायणांचे दर्शन घेवून पुढे धनंजय मुंडे हे भगवानगडासाठी रवाना झाले.
  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर प्रथमच आज नारायणगडावर आले. उपस्थितांनी धनंजय मुंडेंचे जंगी स्वागत केले. धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगडावर नतमस्तक होत आयुष्यात आलेल्या संकटांना लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी मार्ग दाखवतात अन् सद्सद्विवेक बुद्धीने काम करण्यासाठी आशीर्वाद देतात. आज नगदनारायण महाराजांचे आशीर्वाद मिळाले. त्या आशीर्वादाच्या बळावर पुढे मी जिल्ह्यातील आणि राज्यातील लोकांच्या प्रश्‍नांसाठी काम करील. जिल्ह्यातील प्रश्‍न लवकरच मार्गी लागतील, असेही मुंडे या वेळी म्हणाले. पुढे धनंजय मुंडे लागलीच हेलिकॉप्टरने भगवानगडावर गेले. गेल्या काही दिवसांपूर्वी भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री यांनी ना. धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलवलं होतं. स्व. गोपीनाथ मुंडे यांचं शक्तीस्थळ असलेल्या भगवानगडावरून स्व. मुंडे कायमच राजकारणाची दिशा ठरवित राहिले होते. गड राजकीय दिशा ठरवतो असे राज्यभर उघडपणे म्हटले जात होते. आज प्रथमच धनंजय मुंडे हे भगवानगडावर दर्शनासाठी येत असल्याने भगवानगडावर ना.मुंडेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. नारायणगडावरून धनंजय मुंडे थेट भगवानगडावर गेले. त्यांच्या सोबत आमदार प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 (रिपोर्टर)