Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चौदा लाखांचा गुटखा जप्त; केजमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर छापा



केज:- शासनाने गुटख्यावर बंदी घातलेली असतानाही अनेक ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. काही माफियांनी गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आहे. केज येथील कुरेशी मोहल्ल्यामध्ये एका गोडाऊनमध्ये गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती झाल्यानंतर रात्री पोलिसांनी छापा मारला. त्यामध्ये २० पोते गुटखा आढळून आला. गुटख्याची एकूण किंमत १४ लाख ७४ हजार ९२० रुपये इतकी आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हे पण वाचा : - मराठीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात तिची डिझायनर जान्हवी मनचंदाने मारहाण केल्याप्रकरणी फौजदारी खटला दाखल केला


   गेल्या काही वर्षांपासून राज्यात गुटख्यावर बंदी घातलेली आहे. बंदी असतानाही गुटख्याची विक्री थांबलेली नाही. टपर्‍या, किराणा दुकानावर छुप्या पद्धतीने गुटखा विकला जातो. जिल्ह्यातल्या काही माफियांनी गुटख्याचा साठा करून गुटखा विकला जात आहे. केज येथील कुरेशी मोहल्ला भागात असलेल्या मुजाहिद खैरोमिया कुरेशी यांच्या गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या गोडाऊनसह पान टपरीवर छापा मारला असता गोडाऊनमध्ये २० पोते गुटख्याचा साठा आढळून आला.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.


 त्यात काही रत्ना, टोबॅको, जर्दासह गुटख्याचा समावेश आहे. १४ लाख ७४ हजार ९२० रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त करून दुकानाचा मालक मुजाहेद कुरेशी याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे विभागाचे भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख आनंद कांगुणे, पो.ना. गर्जे, पो.ना. हंगे, पो.ना. काळे, चालक नाईक, गर्जे यांनी केली.
हे पण वाचा :- जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्ट्या रद्द