बीड :- गेल्या दोन महिन्यांपासून बीडला जिल्हाधिकारी नाहीत. अनेक कामे खोळंबून पडले असताना अखेर राज्य शासनाला बीड जिल्हाधिकारी द्यायला मुहूर्त सापडला असून राहुल रेखावार नावाचे आयएएस अधिकारी बीडला जिल्हाधिकारी म्हणून येत असल्याची माहिती मंत्रालयाच्या वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. आज किंवा उद्या त्यांची ऑर्डर होईल.
हे पण वाचा :- करोना: महाराष्ट्रातील दोघांचा चीनमधून येण्यास नकार
प्रशासनातल्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यातील बीडचे जिल्हाधिकारी पद तीन महिने रिक्त होते. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये लोकांच्या हिताचे अनेक कामे प्रलंबीत होते. शेकडो फाईलचा पेंडिंग ढिगारा होता. या पदाचा पदभार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे प्रभारी होता. तेही
हे पण वाचा : चौदा लाखांचा गुटखा जप्त; केजमध्ये गुटख्याच्या गोडाऊनवर छापा
स्वत: आयएएस ऑफिसर मात्र असे असतानाही ‘ये नही किया तो चलता है क्या’ असे म्हणत पेंडिंग फाईल ठेवणेच पसंत केले. अनेक वेळा याबाबत महसूल खात्याचे मंत्री ते मुख्यमंत्र्यांपर्यंत बीडचे जिल्हाधिकारी पद रिक्त असल्याची ओरड केली. अखेर आज मुख्य सचिवांनी भारतीय पोलिस सेवेच्या बदल्यांच्या फाईलसोबतच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांच्या बदल्याची फाईल मुख्यमंत्र्यांकडे ठेवली आहे. यामध्ये बीडच्या जिल्हाधिकाररीपदी राहुल रेखावार नावाचे अधिकारी यांची नियुक्ती निश्चित केल्याचे समजते.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए हा कायदा आणल्याने या कायद्यामुळे अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी बीडला पहिल्यांदाच श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांची नियुक्ती केली होती. मात्र त्या कौटुंबिक अडचणींमुळे बीडला रुजू झाल्या नव्हत्या. रेखावर हे महाराष्ट्र केडरचे अधिकारी असून त्यांनी यापूर्वी परभणी महानगरपालिकेला आयुक्त म्हणून काम पहिले आहे. परभणीला मनपा आयुक्त असताना त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली होती. बीडला आल्यानंतर पेंडिंग फाईलचा निचरा, अवैध वाळू वाहतूक, अवैधरित्या उपसा होणारे गौन खनिज याबाबींचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
हे पण वाचा :- जनगणनेसाठी शिक्षकांच्या मेमधील सुट्ट्या रद्द
