Google चं नवं फीचर वापरायचं कसं?
कसा करायचा वापर –
-गुगलच्या या नव्या फीचरद्वारे युजर्स Google Search चा वापर करुन केवळ स्वतःचाच नाही तर इतरांचाही नंबर रिचार्ज करु शकतात.
-याचा वापर करण्यासाठी युजर्सना आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये prepaid Mobile recharge, Sim recharge किंवा recharge यांसारखे शब्द टाकून सर्च करावं लागेल.
-यानंतर रिझल्टमध्ये तुम्हाला मोबाइल रिचार्ज सेक्शन (Mobile recharge Section) दिसेल. येथे युजर्सना मोबाइल नंबर, टेलिकॉम ऑपरेटर आणि सर्कल यांसारखे पर्याय निवडावे लागतील.
-काही युजर्सना सर्चमध्ये ही सर्व माहिती आधीच भरलेली दिसू शकते. यानंतर युजर्सना Browse Plans वर क्लिक करावं लागेल.
-आता गुगल तुम्हाला तुम्ही निवडलेल्या टेलिकॉम ऑपरेटरचे सर्व उपलब्ध प्रीपेड प्लॅन्स दाखवेल. समोर आलेल्या यादीमधून तुम्ही आवडीचा रिचार्ज प्लॅन निवडू शकतात.
-एकदा प्लॅन सिलेक्ट केल्यानंतर व्हॅलिड ऑफर्सची यादी येईल. यानंतर युजर्स ऑफर प्रोव्हाइडर्सवर टॅप करु शकतात. सध्या Freecharge, MobiKwik, Google Pay आणि Paytm यांसारखे प्रोव्हाइडर्स लिस्टेड आहेत.
-एकदा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रोव्हाइडर्सच्या कन्फर्मेशन पेजवर Back to Google बटण दिलेले असते, याद्वारे युजर्स पुन्हा सर्चवर येतात. कन्फर्मेशन पेजवर युजर्सना रिचार्जबाबत कस्टमर सपोर्ट इंन्फॉर्मेशनचा अॅक्सेसही दिला जातो.
