नाशिक: नाशिकमध्ये करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मालेगावमध्ये स्थिती गंभीर बनत चालली आहे. मालेगावात आणखी दोघांचा करोनाने मृत्यू झाला आहे. त्यात एका युनानी डॉक्टर महिला व वृद्धाचा समावेश असून या घटनेने आरोग्य यंत्रणा हादरली आहे.
औरंगाबाद: हुश्श... 'त्या' महिलेच्या बाळाला करोना नाही
सोमवारी येथील सामान्य रुग्णालय व जीवन हॉस्पिटल येथे उपचार घेणारे दोन रुग्ण करोनामुळे दगावले. आज पहाटे ४ वाजता सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेली कुंभारवाडा परिसरातील ५४ वर्षीय युनानी डॉक्टर महिला करोनाने मृत पावली. तसेच जीवन हॉस्पिटलमध्ये मुस्लिमनगर गल्ली नं. ३ मधील ५५ वर्षीय रुग्ण दगावला आहे. त्याआधी रविवारी जीवन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला ३५ वर्षीय कमालपुरा भागातील रुग्णाचा मृत्यू झाल्याने मालेगावी चिंता वाढली आहे. शहरात एकीकडे करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.
सांगलीत एकाला करोना; रुग्णांची संख्या २७वर
त्याचवेळी करोनामुळे मृत होत असलेल्या रुग्णांचा संख्येत वाढ होते आहे. येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ८५ झाला आहे तर आत्तापर्यंत ८ जण दगावले आहेत. गेल्या चोवीस तासात ३ रुग्ण दगावले आहेत..
