मुंबई: 'करोनाच्या संकटानं देशात थैमान घातलेलं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. उलट त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत. सरकारच्या या कारभाराविरोधात उद्या, २१ एप्रिल रोजी देशव्यापी निषेध दिवस पाळण्यात येणार असून सर्व कामगारांनी आपल्या कुटुंबीयांसह घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत उभं राहावं,
करोना रोखण्यात सरकार फेल; राज्यात लष्कर बोलवा: राणे
असं आवाहन करण्यात आलं आहे. सेंटर ऑफ ट्रेड इंडियन ट्रेड युनियन्स () संघटनेनं या निषेध आंदोलनाची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेनंही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.
'लक्षात ठेवा, मुख्यमंत्र्यांच्याभावाचं नाव राज ठाकरे आहे'
'पंतप्रधान केवळ टीव्हीवर येऊन पोकळ भाषणे देत आहेत. करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे याची माहिती देण्याऐवजी लोकांनाच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम देत आहेत आणि त्यांच्यावरच विविध जबाबदार्या टाकत आहेत. याचा निषेध या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
वाचा:औरंगाबाद: हुश्श... 'त्या' महिलेच्या बाळाला करोना नाही
'सीटू'नं आंदोलकांच्या मागण्यांची यादीच जाहीर केली असून बाल्कनीत, दरवाज्यासमोर वा अंगणात उभे राहणाऱ्यांनी या मागण्यांचे फलक हातात घ्यावेत. सोशल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करून हे निषेध प्रदर्शन करावं, असं सांगण्यात आलं आहे. आंदोलकांनी घोषणा देऊन त्याचे व्हिडिओ किंवा फोटो काढून व्हाॅट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर अपलोड करावेत, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
वाचा: इगोच्या राजकारणात पत्रकाराला बळीचा बकरा बनवू नका!

