Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीड जिल्ह्यात करोनाचा पहिला बळी


बीड बातम्या : जिल्ह्यात करोना व्हायरसनं पहिला बळी घेतला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना पॉझिटिव्ह महिलेचा आज पहाटे मृत्यू झाला. तर, औरंगाबादमध्ये ६५ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यामुळं तेथील करोना मृतांचा आकडा ३२ वर पोहोचला आहे. बीडमध्ये करोनाला बळी पडलेली महिला ही नगर जिल्ह्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी होती.
👨🏻‍⚕️ पुण्यात पहिल्या डॉक्टरचा मृत्यू
 आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथे पाहुण्याकडे राहायला आली होती. तिच्यासोबत आणखी सहा जण होते. करोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. पैकी रविवारी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळं तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यातच तिचा मृत्यू झाला.