Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगरमध्ये अनेक ठिकाण हॉटस्पॉट म्हणून जाहीर

loading...

नगरमध्ये अनेक ठिकाण हॉटस्पॉट म्हणून जाहीर

⚡नगर शहरात गेल्या महिन्याभरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. पण सुभेदार गल्लीतील वृद्ध महिला आणि सारसनगरमधील वाहन चालकाला कोरोनाबाधित आढळले.

💫सुभेदार गल्लीतील महिलेची कॉटॅक्ट हिस्ट्री मिळत नाही. परंतु दैनंदिन व्यवहारातून या महिलेच्या संपर्कात तिचे अनेक नातेवाइक आले आहेत.

📍सारसनगरमधील आढळलेला चालक हा पुणे आणि मुंबई येथे जावून आला आहे. त्याची कॉटॅक्ट हिस्ट्री मोठी आहे. हे दोन्ही परिसर शहरातील असल्याने धोका वाढला आहे.

loading...

📌विशेष करून सुभेदार गल्लीतील वृद्धेसह सहा कोरोनाबाधित रुग्ण झाले आहे. जिल्हा आणि महिला प्रशासन यामुळे अलर्ट झाले आहे. सुभेदार गल्लीलगतचा सुमारे दोन किलोमीटरचा परिसर आज सील केला आहे.

💁‍♂️परिसर सील : झेंडीगेट, वंजारगल्ली, सर्जेपुराचा काही भाग, तेलीखुंट, कापडबाजार, माळीवाडा, दाळमंडई, चितळेरोड, नेता सुभाष चौक, जुना मंगळवार बाजार, जुनी महापालिकापर्यंतचा भागाचा समावेश झाला आहे.

🧐या सर्व भागाचे सर्वेक्षण शहर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍याद्वारे केले आहे. या भागातील दैनंदिन व्यवहारावर आता प्रशासनाचे लक्ष असणार आहे. तेथील जीवनावश्यक वस्तू सशुल्क पुरविण्यात येणार आहे.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर