Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नाशिककर गावी जायचंय? मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा!



नाशिकमधून गावी जायचंय? मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा!

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून, त्याची सर्वत्र काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. नाशिकमध्येही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार, आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांना अत्यावश्यक/ वैद्यकीय कामाकरिता बाहेरील जिल्ह्यांत किंवा नाशिक शहरात घराबाहेर पडायचे असल्यास ई-पासद्वारे परवानगी देण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, करोना संपर्क कक्ष (हेल्पलाइन) सुरू करण्यात आली. या ठिकाणी संपर्क साधा: संपर्क कक्षात एकूण ११ मोबाइल व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक (7248906877, 7350166999, 7248922877, 9373800019, 7020583176, 7242903877, 7058946877, 8485810477, 9403165132 आणि 9403165140) तसेच https://ift.tt/2SVgXhh या वेबसाइटद्वारे २४ तास परवानगी देण्याचे काम करण्यात येत आहे. 
ऑनलाइन अर्ज करताना येणाऱ्या अडचणी : (या सर्व अटींची- कागदपत्रांसहित पूर्तता करावी.) परिपूर्ण कागदपत्रे नसणे, उदा. ताप सदृश्य लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे. आधारकार्डवर फोटो नसणे... अर्ज करणाऱ्याने एकाच वाहनात ३ प्रवाशांपेक्षा जास्त प्रवाशांची परवानगी मागणे अर्जदाराने रेल्वेमार्फत जाण्यासाठी विनंती अर्जात उल्लेख करणे वाहनाचा उल्लेख नसणे अर्जदाराने अर्ज केल्यानंतर संबंधित राज्य सरकारने नेमून दिलेले 
नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नाहरकत परवाना मंजूर करणे. या सर्व अटींची पूर्तता केल्यास संबंधित नागरिकांना परवानगी दिली जाणार आहे.

आता कोरोनानंतर चिमुरड्यांना अज्ञात आजाराचा विळखा, 3 मुलांचा मृत्यू