⚡ भारत आणि चीन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.
💁♂️ थोड्याचवेळात लडाखच्या चुशूल परिसरात भारत आणि चीनच्या सैन्याधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात होईल.
👨🏻🎨 भारताच्यावतीने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चर्चेसाठी जाणार आहेत.
👉 भारतीय शिष्टमंडळात 10 अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तर चीनकडून मेजर जनरल लियू लीन वाटाघाटीसाठी येणार आहेत.
📍 या बैठकीत गलवान घाटी, हॉट स्प्रिंग, पँगाँग लेक परिसरातून चीनने सैन्य मागे घ्यावे, अशी मागणी भारताकडून केली जाऊ शकते.
