Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

💧 चिंचवड गावात कमी दाबाने पाणी पुरवठा


पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावात गेल्या 15 दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. गेल्या 15 दिवसांपासून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. चिंचवड गावठाण, तानाजी नगर, गोखले पार्क याठिकाणी कमी प्रमाणात पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
याबाबत पाणी पुरवठा अधिमऱ्यांकडे चौकशी केली असता, उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांडकून सांगण्यात येत आहे की, आम्हाला मागच्या पंधरा दिवसांपासून कमी प्रमाणात होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे.
कमी पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण असून पाणी पुरवठा अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता ते सुद्धा  उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत, तरी याबाबत जाब कुणाला विचारायचा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp