बीड :- नववीच्या वर्गात शिकणार्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुलीच्या वडिलाच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री एका १९ वर्षीय आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नववीच्या वर्गात शिकणार्या एका मुलीची तिच्याच वर्गातील मुलाने त्याच्या भावाशी ओळख करून दिली. यानंतर त्या मुलाच्या भावाने तिची छेड काढली होती. याप्रकरणी त्या मुलीने तिच्या वडिलाला हा प्रकार सांगितल्यानंतर त्या मुलाला वडिलांची चोप दिला होता. त्यानंतरही त्यानी तिची छेड काढल्यामुळे रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
हेही वाचा : आजीबाईचा बटवा - बाल अरोग्य
https://vrhearingroup.blogspot.com/
https://www.ilovebeed.in
BEED NEWS TODAY ILOVEBEED
