Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'बहुमत सिद्ध करण्यासाठी BJPची रणनीती तयार'

मुंबई: येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत होणारा विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकण्यासाठी आजच्या बैठकीत रणनीती आखण्यात आल्याची माहिती भाजपचे आमदार यांनी आज दिली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार यांनी ही माहिती दिली. नेते आशिष शेलार यांनी यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्याबाबतची रणनीती आखण्यात आली असून आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होऊ, असा दावा करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. आमदारांनीच हा ठराव मांडल्याचं शेलार यांनी सांगितलं. राज्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि सक्षम सरकार देण्यात येईल. राज्याच्या विकासाला गती देण्यात येणार असल्यांचही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. फडणवीस-पवार यांचं राज्यात सरकार आल्याने राज्यातील जनतेत आनंदाचं वातावरण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

आमचे आमदार कुठेही जाणार नाही भाजपच्या नेत्यांना कुठेही हलविण्यात येणार नाही. कुठेही डांबून ठेवण्यात येणार नाही. आमच्या आमदारांचा आमच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्यांची पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे त्यांना कुठेही हलविण्याची गरज नाही, असं सांगतानाच आमदारांवर विश्वास ठेवू न शकणाऱ्या शिवसेना-राष्ट्रवादीलाच आमदारांना डांबून ठेवण्याची वेळ आली हे दुर्देव असल्याची टीका शेलार यांनी केली. राज्यात ऑपरेशन कमळ नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र आणि ऑपरेशन अजित पवार सुरू असल्याचंही ते म्हणाले. भाजपच्या समर्थक आमदारांची वेगळी बैठक घेण्यात येणार असल्याचं सांगतानाच सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी सुरू आहे, तर आमदार सुरेश खाड्ये यांच्या भावाचं निधन झाल्याने ते या बैठकीला येऊ शकले नाहीत, असंही ते म्हणाले. अजित पवारच व्हिप बजावतील अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते आहेत. त्यामुळे त्यांनाच व्हिप बजावण्याचा अधिकार आहेत, असा दावाही शेलार यांनी केला. काँग्रेसबरोबर युती ही बोराबाजार आहे, तर आमची युती ही काळाबाजार कशी? असा सवाल करतानाच शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QJfgDk
via IFTTT