Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लिंगाचा आकार आणि लांबी वाढवायची आहे, काय करू?

डॉ. महिंद्र वत्स प्रश्न: मला लिंगाचा आकार आणि लांबी वाढवायची आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल? उपाय सांगा. उत्तर: लिंगाचा आकार किंवा लांबी वाढवणे शक्य नाही. पण तरीही तुम्ही एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन या समस्येवर उपाय काय आहे हे विचारून पाहा. डॉक्टर तपासणी करून योग्य सल्ला किंवा टिप्स देतील. जेणेकरून त्यांनी काही उपाय सूचवल्यास आणि त्यानुसार ते केल्यास तुमचं लैंगिक जीवन सुखी होऊ शकेल. पॉर्न बघून हस्तमैथुन केलं, लिंगाचा आकार वाढलाय? प्रश्न: मी १९ वर्षांचा आहे. अलीकडेच मी पॉर्न पाहून हस्तमैथुन केलं. सुरुवातीची १५ मिनिटे उत्तेजित झालो नाही. हस्तमैथुन करणं थांबवलं तेव्हा लिंगाचा आकार वाढला. काय करू? उत्तर: हस्तमैथुन करतेवेळी वीर्य आणि द्रव गुप्तांगामध्ये जमा झाल्यानं आकार वाढला असण्याची शक्यता आहे. फोरस्किन जर जाड असेल तर वीर्य एकाच ठिकाणी साचतं आणि त्यामुळं त्वचा जाड दिसते. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जा.


from Lifestyle News in Marathi: Lifestyle Online News in Marathi, Fashion News | Maharashtra Times https://ift.tt/34xuO1g
via Lifestyle