Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'महा'शक्तिप्रदर्शन; 'हयात'मध्ये मिनी असेंबली

मुंबई: राष्ट्रवादीचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर भाजपकडून दगाफटका होण्याच्या पार्श्वभूमीवर , आणि राष्ट्रवादीने सर्व आमदारांचं जोरदार शक्तीप्रर्दशन केलं. हॉटेल ग्रँड हयातमध्ये तिन्ही पक्षाच्या १६२ आमदारांची परेड करण्यात आली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही पक्षाचे नेते आणि आमदार एकत्र एकवटले होते. त्यामुळे हॉटेल ग्रँड हयातमध्ये मिनी विधानसभाच भरल्याचं चित्रं दिसत होतं. आज या तिन्ही पक्षांनी केलेली आमदारांची ही परेड हा राज्यपालांवरील दबावतंत्राचा एक भाग असल्याचं सांगण्यात येतं. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकाच मंचावर आले होते. यावेळी मंचावर संविधान ठेवण्यात आलं होतं. यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी यावेळी प्रस्तावना केली. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आमदारांना एकजूट राहण्यासाठी संविधानाची शपथ दिली. काँग्रेसचे अध्यक्ष , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू असीम आझमी, शिवसेना नेते संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आणि खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्या होणाऱ्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षाच्या आमदार आणि नेत्यांनी एकजुटीची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी सर्वांनी उभं राहून शपथ घेतली आणि शपथ पार पडल्यानंतर 'छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणा दिल्या. अशी घेतली प्रतिज्ञा 'मी आमदार XXX. राहणारा XXX. मी शिवसेना/ काँग्रेस/ राष्ट्रवादी या पक्षातून निवडणूक लढवली असून या पक्षामुळे विजयी झालो आहे. मी भारतीय संविधानाला साक्ष ठेवून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, आदरणी सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून स्थापन केलेल्या आघाडीशी मी प्रमाणिक राहिल. मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही. जनतेने भाजविरोधात कौल दिला असून त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. माझ्या हातून भाजपला मदत होईल, असे कोणतेही कृत्य घडणार नाही. माझ्या मतदारसंघातील जनतेविरोधात आणि पक्षाविरोधात गैरकृत्य करणार नाही. मी मतदार आणि पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. माझ्या हातून पक्षविरोधी कारवाई होणार नाही. सर्व नेते सांगतील तो आदेश मानून काम करेल. जय हिंद.'