Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एसटीची शिवशाही बस दरीत कोसळली; अनेक जखमी

पुणे: एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटातील ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त बस पुण्याहून सांगलीच्या दिशेनं चालली होती. या बसमध्ये ४० प्रवासी होते. ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना ही बस ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघात नेमका कशामुळं झाला, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.