छत्रपती शिवाजी महाराजांनी शुन्यातून स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्यांच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून कोंढाण्याच्या युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.
या तान्हाची चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर आज रिलीज झालाय. अजय देवगन, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर यांच्यासह अन्य कलाकारांचा समावेश असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरने अवघ्या काही मिनिटातच धुमाकूळ घातलाय.