बीड :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आकस्मितपणे भारतीय जनता पार्टीशी संलग्न होत आज सकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेने राष्ट्रवादी पुरती हादरून गेली. पक्षाचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांनी ट्विटद्वारे तो त्यांचा स्वतंत्र निर्णय असल्याचे सांगत राष्ट्रवादीशी त्यांचा संबंध नाही असे सांगून टाकले. दुपारी १२ वाजता अजित पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अधिकृतरित्या हकालपट्टी करण्यात आली. एकीकडे देवेंद्रे फडणवीस आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असतांना अजित पवारांची ही हकालपट्टी पुढच्या सात दिवसात राजकीय पेच निर्माण करणारी ठरणार आहे. हकालपट्टीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी केल्याने हा पेच अधिकच दृढ होतांना दिसून येत आहे.
आज सकाळी ८ वाजता अजित पवारांनी भाजपाची सलगीकरत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेने भाजपाच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. तात्काळ अजित पवारांची पक्षातून अधिकृतरित्या हकालपट्टी करण्यात आली. आपल्यासोबत २० ते २२ आमदार असल्याचा दावा पवारांकडून केला जात होता. हकालपट्टी झाल्यानंतर अजित पवारांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांना एक व्हीप काढला. गेले दोन दिवस शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात सत्ता स्थापनेबाबत बोलणे सुरू असतांनाच राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी ५४ आमदारांचं सह्याचं पत्र भाजपासाठी राज्यपालांना सादर केलं. या सर्व घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भुकंप झाला असून भाजपाने सत्ता स्थापन केली असली तरी यात मोठा राजकीय पेच निर्माण होतांना दिसून येत आहे.
beedreporter.net Beed News, maharashtra News, Apb Majha News beed,
