मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख यांच्या शिवतीर्थावर उद्या होणाऱ्या शपथविधीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने मात्र शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमची प्रार्थान एवढीच असेल की उद्या काही अप्रिय घटना घडू नये, असं कोर्टाने म्हटलं आहे. वीकम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने ही चिंता व्यक्त केली. सार्वजिनक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाही तर जो तो उठेल आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल, असं सांगत कोर्टाने सुरक्षेबाबतची चिंताही व्यक्त केली. न्यायापूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायामूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने ही चिंता व्यक्त केली. याच संघटनेने २०१०मध्ये शिवाजी पार्कला शांतता क्षेत्र घोषित करण्यात यावं म्हणून याचिका दाखल केली होती. त्यानंतर परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं होतं.