तुमचे केस वयाच्या आधीच पांढरे होत आहे का? असे असल्यास या लेखात तुमच्या साठी महत्वपूर्ण माहिती आम्ही घेऊन आलो आहोत. हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आयुष्यात अनेक समस्या आहेत त्या समस्या आरोग्याशी पण निगडित असण्याची शक्यता असते, म्हणूनच अकाली होणारी पांढरे केस पण ही सर्वात मोठी समस्या हल्ली लहान मुलांना व तरुणांना भेडसावत आहे. तर टेन्शन नका घेऊ ही आहेत प्रमुख कारणे ज्या मुळे केस होतात अकाली पांढरे. मानवाच्या शरीरात “मेलनिन” नावाचे एक द्रव्य आहे, जे आपल्या केसांना काळे ठेवण्याचे कार्य करते. जेव्हा मेलनिन नवीन पेशींची निर्मिती करण्याचे थांबवते, तेव्हा आपले केस पांढरे होण्यास सुरुवात होते.
१) सवयी तील अनियमितता
अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे असतात. काहीवेळा वंशपरंपरेने सुद्धा केस पांढरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर हल्ली वाढणारे प्रदूषण हे सुद्धा केसांच्या पांढरे होण्यास कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर कधीही कधीही खाणे – पिणे. बदललेली जीवनशैली या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो त्याच बरोबर आपल्या मनावर, आपल्या केसांवर सुद्धा होत असतो. त्यामुळे सुद्धा केस पांढरे होतात.
२) संगणक व मोबाईलचा अतिवापर
सध्याचे युग हे तांत्रिक युग आहे हे सर्वांना माहिती आहे या युगामुळे पारंपरिक माध्यमां ऐवजी डिजिटल माध्यमांचा अधिक वापर करतो. प्रत्येकजण आपणास मोबाईल वापरताना, संगणकावर गेम खेळताना व काम करताना पाहायला मिळतात या सर्वांमुळे कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या जा काही रेडिएशन असतात. त्या रेडीएशन चा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याचाच परिणाम परिणाम आपल्या केसांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या यंत्राचा परिणाम आपल्या मेंदूवर होऊन त्याचे रूपांतर आजारांमध्ये होण्याची शक्यता होण्याची शक्क्ता असते.
३) ताण-तणाव
सध्याच्या काळात ताणतणाव, चिंता ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य समीकरण बनले आहे. ताण आणि मनुष्य हे दोन्ही एकमेकांची निगडित आहे. आपण आजूबाजूला पाहिले तर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळी लोकं तणावाच्या खाली जगत आहेत. तणाव खाली राहण्याची कारणे सुद्धा वेग वेगळी आहेत त्यामुळे अतिताण घेतल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. त्याच बरोबर केसांना सुद्धा असतो, म्हणून केस पांढरे होण्याचे थांबवायचं असेल तर ती विचार करणं थांबवायचं लागेल.
४) केसांना तेल न लावणे
केसांना तेल न लावणे यांस लोक जास्त प्राधान्य देतात परंतु काही कारणामुळे केसांना तेल न लावल्यामुळे सुद्धा पांढरे होऊ शकतात हे आपणास माहीत आहे का ? तेल न लावल्यामुळे केसांना योग्य ती पोषकद्रव्ये मिळत नाही. जर केसांना योग्य पोषकद्रव्य मिळालं नाही तर त्याची वाढ नीट होणार नाही तसेच गळण्याचे व केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढेल म्हणूंन योग्य ते पोषकद्रव्य न मिळाल्यामुळे केस पांढरे होऊ शकतात.
५) मद्यपानाचे अति सेवन
मद्यपानाच्या सातत्याने सेवन केल्यामुळे केस पांढरे होतात, त्याचबरोबर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि मद्यपानाचे सेवन करू नये.
६)केमिकल शॅम्पू आणि हेअर प्रॉडक्ट
जाहिराती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. माध्यमातून आपल्याला वर सरासर टेलिव्हिजनच्या साहाय्याने जाहिराती पाहायला मिळतात या जाहिरातीतून अनेक केसांच्या संबंधातील उत्पादन आपल्याला दाखवले जातात या उत्पादनांचा वापर सुद्धा भरमसाठ होतो पण त्या उत्पादन मध्ये वापरलेल्या रासायनिक द्रव्यांमुळे केसांना हानी पोहोचते आणि त्या मुळे केस पांढरे होण्याची शक्यता असते.
७) कमी झोप
वाढत्या ताणतणावांमुळे तसेच बदलत्या राहणीमानामुळे, जीवनशैलीमुळे माणसाची झोप कमी कमी होत चालली आहे. हेसुद्धा केस पांढरे होण्याकरिता महत्त्वाचे कारण आहे.
८) ऍलर्जी
काही रासायनिक वस्तूंचा अतिवापरामुळे आणि केसांच्या मुळाना होणान्या ऍलर्जीमुळें केसांचा रंग पालटतो. त्यामुळे औषध व अन्य रासायनिक प्रक्रियेचा योग्य तो परिणाम न झाल्याने केसांवर यांचा विपरीत परिणाम होतो. म्हणून ऍलर्जी मूळे केस पांढरे होऊ शकतात.
