मुंबई: गेल्या जवळपास महिनाभरापासून महाराष्ट्रात निर्माण झालेला सत्तेचा पेच अखेर सुटण्याची चिन्हं दिसत आहेत. सरकार स्थापनेसाठी सुरू असलेली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्याही क्षणी नव्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. लाइव्ह अपडेट्स: >> या देशाची घटनाच सेक्युलर शब्दावर आधारलेली आहे. त्यामुळं त्यावर चर्चा होण्यासारखं काहीही नाही - राऊत >> मुख्यमंत्रिपदाबद्दल तिन्ही पक्षांमध्ये काहीही चर्चा झालेली नाही. विनाकारण गोंधळ उडवून देऊ नका - राऊत >> सोनिया गांधी यांना इतक्यात भेटण्याचं प्रयोजन नाही - राऊत >> काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांची बैठक मुंबईत होईल - राऊत >> खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू >> खासदार संजय राऊत यांची टोलेबाजी सुरूच; ट्विटरवरून जुन्या मित्रपक्षाला अप्रत्यक्ष चिमटे >> दिल्लीत आज काँग्रेस कार्यसमितीचीही बैठक होणार; २३ सदस्यांना आमंत्रण >> शिवसेना खासदार संजय राऊत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार >> शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांची उद्या संयुक्त बैठक होण्याची शक्यता >> दिल्लीत आज महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक >> >> >> >> महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली अंतिम टप्प्यात; शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार येणार