Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

LIVE : राज्यपाल कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच काल महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या नाट्यमय घडामोडींना आता चोवीस तास उलटून गेले असले तरी यापुढं नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहूयात या घडामोडींचे सर्व अपडेट्स... >>राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार परत येण्याची शक्यता; नवाब मलिक यांचे ट्विट >> सकाळी १०.३० वाजता भाजपचे आमदार आशिष शेलार पत्रकार परिषद घेणार >>भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल >> जयंत पाटील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर पोहोचले >>अजित पवार यांच्या चर्चगेट येथील प्रेमकोर्ट येथील निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी >> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट >> , काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेवर न्या. एनव्ही रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी >> नाट्यमय शपथविधी विरोधात शिवसेना नेते संजय राऊत यांचं ट्विट... >> कॉंग्रेस आमदारांचा मुक्काम जयपूर , भोपळला नव्हे तर मुंबईतच... सुत्रांची माहिती >> पुन्हा नव्याने टीम बांधू... शरद पवार यांचा पावसात भाषण करतानाचा फोटो टाकत सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस पुन्हा बदललं वाचा: >> आज दुपारी २ वाजता पुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक >>भाजपच्या सत्तास्थापनेविरोधत दाखल केलेल्या याचिकेवर आजसकाळी ११.३० वाजता विशेष सुनावणी होणार


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2se8tHN
via IFTTT