मुंबई: महाराष्ट्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्ता स्थापन करणार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी, आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाला. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE अपडेट्स: >> आमचं सरकार पुढची १५ वर्षही टिकेल याची खात्री: जितेंद्र आव्हाड >> मी करेन तो कायदा म्हणणाऱ्यांना धक्का: जितेंद्र आव्हाड >> राजकीय माज,
अरेरावी महाराष्ट्राने उतरवली: जितेंद्र आव्हाड >> भाजपही पराभूत होऊ शकतो हे महाराष्ट्रानं सिद्ध केलं: जितेंद्र आव्हाड >> महाराष्ट्राने दिल्लीला शह दिला: जितेंद्र आव्हाड >> मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता >> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, केसी वेणुगोपाल आज शरद पवारांना भेटणार >> हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा महाविकास आघाडीला पाठिंबा >> उद्यापासून पत्रकार परिषद घेणार नाही: संजय राऊत >> अजित पवार राजीनामा देणार आणि पुन्हा येणार हे मी आधीच सांगितले होते: संजय राऊत >> मी चाणक्य वगैरे नाही; मी एक लढाऊ योद्धा आहे: संजय राऊत >> मंत्रालयानंतर पुढचं सूर्ययान दिल्लीतही उतरेल: संजय राऊत >> महाराष्ट्रानं देशाला नवा मार्ग दाखवलाय: संजय राऊत >> शिवरायांचा महाराष्ट्र झुकणार नाही: संजय राऊत >> संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला सुरुवात >> आदित्य ठाकरेंनी घेतली आमदारकीची शपथ >> उपमुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात >> सर्वांच्या सहमतीनं हे सरकार बनतंय, त्यामुळे आम्ही ५ वर्षांसाठी राज्याला स्थिर सरकार देऊ: अशोक चव्हाण >> आम्ही एकमताने निर्णय घेतले आहेत: अशोक चव्हाण >> उद्धव ठाकरे राजभवनात दाखल; राज्यपालांची भेट घेतली >> प्रणिती शिंदे यांची आमदारकीची शपथ >> नवाब मलिक यांनी घेतली आमदारकीची शपथ >> भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ >>काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदारकीची शपथ घेतली >> हरीभाऊ बागडे यांनी आमदारकीची शपथ घेतली >> राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली >> जयंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली >> उद्धव ठाकरे 'मातोश्री'हून राजभवनाकडे रवाना; घेणार राज्यपालांची भेट >> पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली शपथ >> भास्कर जाधव यांनी घेतली आमदारकीची शपथ >> राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतली आमदारकीची शपथ >> माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आमदारकीची शपथ >> माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदारकीची शपथ >> विधीमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात >> सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची गळाभेट >> पवार साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचे ऐकणं माझी जबाबदारी: अजित पवार >> मी राष्ट्रवादीतच होतो आणि कायम राष्ट्रवादीतच राहीन: अजित पवार >> सध्या काहीही बोलायचं नाही; मी योग्यवेळी बोलेन: अजित पवार >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत >> सकाळी ९ वाजता उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेणार >> अभी तो पुरा आसमान बाकी है... संजय राऊत यांचं नवं ट्विट >> विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार >> सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार