गेल्या तीन महिन्यापूर्वी राज्य शासनाने महापरिक्षा पोर्टलद्वारे बीड जिल्ह्यातील महसूल विभागात रिक्त असलेल्या ६६ तलाठीच्या जागासाठी लेखी परीक्षा घेतली होती. या लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. ही पडताळणी दोन दिवसात पूर्ण करून यशस्वी उमेदवाराला नियुक्ती देण्यात येणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी आघाव पाटील यांनी सांगितले.
राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या पुर्वी महापरीक्षा पोर्टलद्वारे बीड जिल्ह्यातील महसूल विभागात ६६ जागा रिक्त होत्या. या भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुषंगाने लेखी परीक्षेला बसलेल्या उमेदवाराची परीक्षा घेण्यात येवून त्यातील उत्तीर्ण उमेदवारांना आजपासून आपले मुळ कागदपत्र घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील मिरीट हे १७८ गुणाला बंद झाल आहे तर अनुसूचित जातीच्या उमेदवाराचे मिरीट हे १६८ ला बंद झाले आहे. एका जागेसाठी ५ उमेदवारांना जिल्हा प्रशासनाने कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले आहे. दोन ते तीन दिवसात या उमेदवाराची कागदपत्राची पडताळणी इतर बाबीची पडताळणी करून पुढील आठवड्यात यांना नियुक्ती आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा सुशिल बेकारीच्या वातावरणामध्ये महसूल विभागाने या तलाठी भरतीच्या प्रक्रियेतील यशस्वी उमेदवाराच्या कागदपत्राची पडताळणी आणि नियुक्ती देण्यात येणार असल्याने थोडेसे हायसे वातावरण या सुशिक्षीत बेरोजगार तरूणात निर्माण झाले आहे.
