ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनांस्थळी तत्काळ पोहचण्यासाठी, दिवसा-रात्री पेट्रोलिग करण्यासाठी, आरोपिंचा पाठलाग करण्यासाठी, आरोपिंना कोर्टात, दवाखाण्यात घेवून जाण्यासाठी, ठाणेप्रमुकांसाठी प्रत्येक ठाण्यात एकच पोलिस व्हॅन आहे. काही अनुसुचीत प्रकार घडल्यास घटनास्थळी तत्काळ जातांना अनेक वेळा खटारा व्हॅन बंद पडलेली असते किंवा ती इतर घटनास्थळी गेलेली असते. अशा वेळी पोलिसांना खाजगी रिक्षा किंवा टॅक्सीचा आधार घ्यावा लागतोय, त्यामुळे पोलिस घटनास्थळी उशिरा पोहचल्याने किरकोळ घडणारी घटना गंभीर स्वरुपाची घडते.
पेठ बीड पोलिस ठाण्यात केवळ एक पोलिस व्हॅन आहे. तर दोन दुचाकी आहेत. मात्र त्यातील दोन्हीही दुचाकी बंद पडलेल्या असून केवळ एकच व्हॅन सुरु आहे. शहर पोलिस ठाण्यात देखील एकच व्हॅन आहे. एक व्हॅन पेट्रोलिग करण्यासाठी गेली असता दुसर्या घटनास्थळावर जातांना पोलिसांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन व्हॅन असून एक धक्का स्टाट आहे तर दुसरी खटारा झालेली आहे. आरोपिंचा पाठलाग करतांना अशा व्हॅनमुळे आरोपी अनेक वेळा पसार होत आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात एक व्हॅन व एक दुचाकी आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी पाहता या पोलिस ठाण्यात व्हॅनची अवश्यकता आहे. मात्र नविन व्हॅन सोडा आहेत त्याच व्हॅन दुरुस्त होत नसल्याची खंत अनेक पोलिस कर्मचारी व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यात कर्मचार्यांप्रमाणे वाहनांची देखील कमतरता आहे. प्रत्येक वर्षी पोलिस महानिरिक्षक मोटार परिवहन पुणे यांच्याकडे नविन चारचाकी गाड्यांची मागणी केली जाते. ५ ते १० ननिव गाड्या येतात मात्र तेवढ्याच गाड्या खराब होत आहेत. त्यामुळे वाहनांची कमतरता आहे. सर्व ठाण्यातील दुचाकी दुरुस्त करुन त्यांना जीपीएस बसविण्यात येणार आहे.
-विजय कबाडे
अपर पोलिस अधिक्षक, बीड
ग्रामीण पोलिस ठाण्याची
हद्द मोठी, गाडी मात्र एकच
बीड ग्रामीण पोलिस ठाण्यापासून शेवटचे गाव हे २५ ते ३० किलोमिटर पर्यंत आहे. अशा वेळी जर पोलिस व्हॅन हिरापूरकडे घटनास्थळी गेली अन् त्याच वेळी मांजरसुंबा भागात काही घटना घडली तर पोलिसांना खाजगी वाहन भाड्याने करुन घटनास्थळी जावे लागते. अशा वेळी घटनास्थळी जाण्यासाठी उशिर झाला तर किरकोळ घटना गंभीर होत आहेत.
