Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबई: बीचवर बेवारस बॅग; आत हातापायांचे तुकडे


मुंबई: माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर एक बेवारस सुटकेस सापडली असून त्यात हातापायांचे तुकडे आढळल्यानं खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळची ही घटना असून सुटकेसमध्ये पुरुषाचा मृतदेह असल्याचं पोलिसांनी सांगितलं. माहीम दर्ग्याच्या पाठीमागच्या समुद्र किनाऱ्यावर काही तरुणांना ही सुटकेस दिसली. सुटकेस जड लागल्यानं त्यांनी उलडून पाहिलं असता त्यात तुटलेले हात आणि पाय आढळले. त्यामुळं घाबरलेल्या तरुणांना लगेचच पोलिसांना ही माहिती दिली. ही माहिती मिळताच माहीम पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुटकेस ताब्यात घेतली. ही सुटकेस काळ्या रंगाची असून अमेरिकन टुरिस्टर कंपनीची आहे.
हेही वाचा : अरोग्य विषयी
पाण्यावर तरंगताना ती आढळली. त्यात मानवी शरीराचा खांद्यापासून कापलेला डावा हात व गुडघ्यापासून खाली कापलेल्या अवस्थेतील उजवा पाय व प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत पुरुषाचे कापलेले गुप्तांग आढळून आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. शीर आणि धड काहीच नसल्यानं हे हात आणि पाय कुणाचे आहेत हे कळू शकलेलं नाही. हे तुकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेज व इतर माध्यमातून सुटकेस टाकणाऱ्याचा शोध सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.



lokprashna

beed lokmat

beed citizen

beed reporter

hello beed

beed news paper