Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर: क्षुल्लक वादातून मित्रावर गोळीबार

अहमदनगर: राहाता तालुक्यातील लोणी येथे गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. फरदिन उर्फ भैय्या (रा.श्रीरामपूर) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. उमेश नागरे, अक्षय बनसोडे, सुभाष कदम, अरुण चौधरी (चौघे रा.लोणी) तर संतोष सुरेश कांबळे, सिराफ उर्फ आयुब शेख, शहारूख शहा पठाण, फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी (तिघेही रा.श्रीरामपूर) हे सात जण दारू पिण्यासाठी व जेवणासाठी साई छत्रपती या हॉटेलमध्ये रविवारी रात्री आले होते. यावेळी त्यांची हाटेलमध्येच आपसाआपसात शाब्दिक बाचाबाची झाली. या शाब्दिक बाचाबाचीतूनच एकानं फरदिन उर्फ भैय्या आबू कुरेशी याच्यावर गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे कुरेशी हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर इतर सर्व जण फरार झाले होते. मात्र सोमवारी सकाळपर्यंत सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी आर्थिक देवाण घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असे पोलिस सांगत आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2PgWQYz
via IFTTT