Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मी धनंजय पंडितराव मुंडे... अन् जिल्ह्यात जल्लोष अजित पवार उपमुख्यमंत्री तर धनंजय मुंडे कॅबिनेट मंत्री ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला २६ जणांना कॅबिनेट मंत्री तर दहा जणांना राज्यमंत्री पदाची दिली शपथ



बीड/मुंबई:- टिव्हीवर एकटक लावून बसलेल्या जिल्ह्यातील तमाम मुंडे समर्थकांना धनंजय मुंडे दिसले अन् त्यांनी राज्यपाल उपस्थित असलेल्या व्यासपीठावरून ‘मी धनंजय पंडितराव मुंडे...’ म्हणताच बीड जिल्ह्यात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष सुरू झाला. तर तिकडे परळीत ‘धनंजय मुंडे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणेने परिसर दणाणून गेला. आज विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला. या वेळी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. ३६ मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. यामध्ये २६ कॅबिनेट तर १० राज्य मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी आज शपथ घेतली.

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्यपाल कोश्यारी यांनी २६ कॅबिनेट मंत्र्यांना तर १० राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. विधी मंडळ शेजारील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेजला लागून भव्य मंडप उभारण्यात आला होता. ७०० पेक्षा जास्त जणांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कॉंग्रेसचे माजी मुख्मंत्री अशोक चव्हाण यांनी पअर्०  अअअअअ्रअअअ र्ए/.द आणि गोपनियतेची शपथ घेऊ न तिसर्‍या नंबरला/?; ्र ै ऐ ैैह  राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. चौथ्या क्रमांकावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक नेता म्हणून ओळखले जाणारे धनंजय मुंडे यांचे नाव घेताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. धनंजय मुंडेंनी

‘मी धनंजय पंडितराव मुंडे...’ म्हणताच बीड जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला. परळीत फटाक्यांची आतिषबाजी झाली. धनंजय मुंडे मंत्रिपदी विराजमान झाल्याने अनेकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यापाठोपाठ विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, डॉ. राजेंद्र सिंगाने, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनिल केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादा भुसे, जितेंद्र आव्हाड, संदीपान घुमरे, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर, अनिल परब, उदय सावंत, के.सी.पाडवी, शंकरराव गडाख, असलम शेख, आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली तर अब्दुल सत्तार, सतेज पाटील, शंभूराजे देसाई, बच्चू कडू, विश्‍वजीत कदम, दत्तात्रय भारणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्ता तनपुरे, राजेंद्र पाटील यांनी राज्यमंत्री म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.



 (रिपोर्टर)