Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'हॅलो... मी दारुडा आहे मला अटक करा '


दारुचं व्यसन सोडवण्यासाठी एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच गळ घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे. या व्यक्तीनं स्वत:हून १०० नंबरवर वारंवार फोन करून 'हॅलो..मला अटक करा मी दारुडा आहे', अशी अजब मागणी पोलिसांकडे केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
व्यसन सोडवण्यासाठी पोलिसांना फोन कशाला? यावर व्यसनाधीन व्यक्तीनं दिलेली प्रतिक्रिया फेसबुकवर व्हायरल झालीय. 'मी रोज दारु पितो, त्यामुळे मला पोलीस ठाण्यात घेऊन चला. पोलीस ठाण्यात १०-१२ दिवस राहिलो तर मला दारु मिळणार नाही आणि माझं व्यसन सुटेल', असं व्यसनाधीन व्यक्तीचं म्हणणं आहे. संबंधित व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, सोशल मीडियात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरुय. काही नेटीझन्स त्याच्या इमानदारीचं कौतुक करतायत तर काहींनी संबंधित व्यक्तीनं पोलिसांना दिलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.