Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

डिसेंबर मध्ये ७२००० पदांच्या महाभरतीला सुरवात



शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलिस, महसूलसह अन्य शासकीय विभागांतील 72 हजार रिक्‍त जागांच्या भरतीला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.

महाभारती 2019 लवकरच सुरू होत आहे, ही महाराष्ट्रातील विविध नोकर्या आणि रिक्त पदांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी खरोखर चांगली बातमी आहे. महापरिक्षा विभागाने घोषित केले आहे की लवकरच लवकरच नवीन महाभारती (मेगा भरती) 72000 रिक्त पदांसाठी सुरू होणार आहे. ही भारती प्रक्रिया महाराष्ट्रातील विविध विभागांतर्गत राबविली जाईल.


पशुसंवर्धन विभागातील पर्यवेक्षक व परिचर, डॉक्‍टरसह अन्य रिक्‍त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मंडळामधील रिक्‍त पदांचीही भरती डिसेंबरमध्ये होणार आहे. शासकीय कार्यालयांकडून रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, त्यानुसार तब्बल 72 हजार जागांची भरती होणार आहे. 15 डिसेंबरनंतर सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. जून 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. बहुतांश विभागांतील रिक्‍त पदांची भरती एकाचवेळी केली जाणार आहे. डिसेंबरअखेरीस पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागांमधील रिक्‍त पदांची भरतीप्रक्रिया सुरू होईल, असे नियोजन केले आहे. सरकार स्थापन झाल्याने त्याला गती येईल, असा विश्‍वासही महापरीक्षा कक्षाच्या सूत्रांनी व्यक्‍त केला. तसेच लवकरच पुढील महिन्यात पोलीस भरतीचा दुसरा टप्पा होणे अपेक्षित आहे.या पोलीस भरती संदर्भतील माहितीसाठी येथे क्लिक करा. 


ठळक बाबी… 
  • – जून 2020 पर्यंत पूर्ण होणार 72 हजार रिक्‍त जागांची भरती
  • – शासकीय विभागांमधील बहुतांश रिक्‍त पदांची एकाचवेळी होणार भरती. सर्वांना मिळणार संधी
  • – पशुसंवर्धन विभागातील सुमारे आठ हजार रिक्‍त जागांसाठी तब्बल दीड लाखाहून अधिक अर्ज
राज्य सरकारच्या विविध कार्यालयांतील रिक्‍त पदांची माहिती मागविण्यात आली असून, महापरीक्षा कक्षाच्या माध्यमातून महाभरतीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होतील, असे नियोजन केले आहे.
– सीताराम कुंटे, अवर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन, मुंबई
अन्य महत्वाच्या होणाऱ्या भरत्या बद्दल माहिती खालील लिंक्स वर दिलेली आहे 

पोलिस भरती 2019 Online नोंदणी - मुदतवाढ

CDAC Recruitment 2019 - सीडीएसी भर्ती 2019