Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीडमध्ये पोलीसाची गोळी झाडून आत्महत्या


Source Beed Reporter 



बीड :येथील शिवाजी नगर  पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवार दि. 17 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांना सुसाईट नोट सापडली असून एका जळगावच्या तरुणींनी सतत ब्लॅक मेल केले असल्यामुळेच आत्महत्या केल्याचा सुसाईट नोटमध्ये उल्लेख आहे.

दिलीप प्रकाश केंद्र असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे.गेल्या एक वर्षांपूर्वी ते जळगाव  येेथून बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये बदली होऊन आले होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून केंद्रे हेे अस्वस्थ होतो. शिवाजीनगर पोलीस पुुढील तपास करत आहेत.