शिरूर :- ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या नराधमास फाशी द्या, अशी मागणी करत संतापलेल्या शिरूरकरांनी आज शिरूर बंदची हाक देत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. गेल्या दोन दिवसांपूर्वी घडलेल्या
शिरुरमध्ये 11 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याच्यार
बलात्काराच्या घटनेचे आजही शिरूरसह तालुक्यात पडसाद उमटत आहेत. शालेय विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता.
शिरूर तालुक्यातील मानूरजवळ असेल्या हनुमानवाडी येथे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर २२ वर्षीय तरुणाने बलात्कार केला. या घटनेने तालुकाच नव्हे तर जिल्हा हादरून गेला. घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असल्याने आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटकही केली, मात्र सदरील बलात्कार्यास फाशीची शिक्षा द्या, म्हणत आज शिरूरसह तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या. शिरूर कडकडीत बंद ठेवून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. आज सकाळी सर्व पक्षीय कार्यकर्ते जिजामाता चौक या ठिकाणी एकत्रित आले. विद्यार्थ्यांसमवेत त्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. या बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आणि लवकरात लवकर नराधम बलात्कार्यास फाशी द्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
(रिपोर्टर)
