Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ना समर्थनार्थ ना विरोधात कुठल्याच मोर्चाला परवानगी नाही -हर्ष पोद्दार - Today Beed News



बीड :- कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने बीड जिल्ह्यात १४४ कलमान्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आल्याचे सांगत जोपर्यंत जमावबंदी आदेश लागू आहे तोपर्यंत ना समर्थनार्थ ना विरोधात कुठल्याही मोर्चाला परवानगी देणार नाही, असे म्हणत जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी काल दगडफेक केलेल्या तथाकथीत नतद्रष्टांच्या मुसक्या बांधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज चेक करणार असल्याचे म्हटले आहे.
   आज जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कालच्या दगडफेकीच्या घटनेवर पत्रकार परिषद घेतली. सुरुवातीलाच हर्ष पोद्दार यांनी अफवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगडफेक झाली नसल्याचे सांगून याबाबत कोणी अफवा पसरवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, असे म्हणत त्याच्यावर तात्काळ ५५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत कालच्या घटनेत काही संघटनांचा समावेश आहे का याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे या वेळी त्यांनी म्हटले. कालच्या दगडफेक प्रकरणी ३० जणांना ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर जवळपास १०० जण यामध्ये सापडू शकतात. दगडफेकीमध्ये १८ ते २३ वर्षांच्या (पान ७ वर)

युवकांचा समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले. याच घटने दरम्यान अंबाजोगाईमध्ये देखील दगडफेक झाली होती. त्यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांची उपस्थिती होती.

पोद्दार साहेब, पुढारपण करणार्‍यांची मानसिकता तपासा
दगडफेक करणार्‍या पोरांवर कठोर कारवाई करायलाच हवी, परंतु समाजात हिरोगिरी करू पाहणार्‍या तथाकथीत पुढारपण करणार्‍यांची मानसिकताही तपासायला हवी, काल जत्थ्यानी लोक गल्लीबोळातून बशीरगंजमधून येत होते, त्याचे नेतृत्व कोण करत होतं? त्यांचा उद्देश काय होता? हे तपासणे गरजेचे आहे. ज्यांनी दगडं मारले त्यांच्यावर कारवाई तर कराच परंतु यामध्ये निष्पापांवर कारवाई होणार नाही याची दक्षता घ्या. सीसीटीव्ही फुटेजमधून दुधाचं दुध आणि पाण्याचं पाणी तुम्ही करालच अशी सर्वस्तरातून अपेक्षा व्यक्त होत आहे.



ग़ोपीनाथ मुंडे साहेबा नंतर कोनता नेता चागला आहे Vote 


रिपोर्टर