नगर : शिर्डी साईबाबांचा जन्म कुठे झाला यावरून शिर्डी आणि पाथरीत वाद सुरू आहे. हा वाद थोडा थंड झाला असतानाच आता साईबाबा हे बीडमध्ये नोकरीला होते, असा दावा काही जणांनी केला आहे. त्यामुळे बीडच्या विकासासाठीही १०० कोटींचा निधी द्यावी, अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यामुळे या वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा :- केंद्र सरकारने एनआरसी, सीएए, एनपीआर कायदा आणला आहे, एनआरसी कायदा रद्द करा
साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली. त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. राष्ट्रीय कीर्तनकार भरत बुवा रामदासी यांनी मौखिक पुरावे असल्याचे दाखले दिले आहेत. तर साईबाबा बीडमध्ये असल्याचे साईचरित्रात उल्लेख आहे.
हे पण वाचा : - पुणे: सावत्र बापच गेल्या दोन वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दामिनी पथकाच्या महिला मार्शलने शाळेत धाव घेतली.
मौखिक परंपरेनुसार जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितले होते की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानात कामाला होते. ४ ते ५ वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. असे साईभक्त आणि राष्ट्रीय किर्तनकार भरत बुवा रामदासी यांनी म्हटले.
हे पण वाचा : -'आई, माझे आणि बाळु काकाचे काहीच नव्हते, आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. मात्र, शेजारचे बेंद्रे सरांनी आमचे सार्या गावात केले.'
