कृषिकिंग : वाढती थंडी आणि संतुलित पुरवठ्यामुळे अंड्यास किफायती बाजारभाव मिळत आहे. जानेवारी महिन्यात आतापर्यंत ४५० प्रतिशेकडा सरासरी बाजारभाव मिळाला आहे. मागील महिन्याच्या तुलनेत सुमारे २० टक्क्यांनी बाजारभावात सुधारणा दिसत आहे.
हे पण वाचा :- संगमनेर:- रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !
मागील वर्षभरात अंड्यांचा प्रतिनग उत्पादन खर्च चार रुपयांवर वाढला होता. तुलनेत बाजारभाव मात्र साडेतीन रुपयापेक्षा कमी मिळत गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. चालू वर्षांत बाजारभावात सुधारणा आणि कच्च्या मालात संभाव्य उतरता कल यामुळे अंडी उत्पादक शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ अपेक्षित आहे.