मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असे बोललेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा, असे कुठेही संबोधण्यात आलेले नाही. जाणता राजा हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला. पण रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, तर जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले. इतकच नाही तर मी कुठेही मला जाणता राजा म्हणा असं बोललेलो नाही, असे सांगतानाच शरद पवार यांनी भाजप नेते माजी खासदार उदयनराजे भोसले यांना जोरदार टोला लगावला आहे.
हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत से-क्स !
शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते, ही कमाल लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. निवडणुकीत तुम्ही लोकांनी गंमत केली. साताऱ्याच्या कोणी काही म्हटलं. पण मला त्यावर काहीही बोलायचे नाही. त्यासाठी रामराजे पुरेसे आहेत, असा टोला त्यांनी उदयनराजे भोसले यांना लगावला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जनता राजा अस कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. जाणता राजा हा शब्द प्रयोग रामदासांनी वापरला. पण रामदास हे महाराजांचे गुरु नव्हते, तर जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले.— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 15, 2020
pic.twitter.com/OvHTXlJ1dP
