बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने मराठवाड्याला दिलासा दिला. ४० टक्क्यापेक्षा जास्त तलावे भरलेले आहे. अनेक विहिरींना पाणी आले. मात्र भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी विभागीय आयुक्ताने जिल्ह्यात जास्तीत जास्त विहिरी खोदण्याचा निर्णय घेतला. गावपातळीवर टँकरची मागणी करण्याची वेळ येवू नये यासाठी ४४० विहिरींना मंजूरी देण्यात आली. बीड तालुक्यात ८७ विहिरी खोदल्या जाणार आहेत. एका विहिरीला सात लाख रूपये खर्च करण्यात येणार आहे.
सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. मात्र प्रशासकीय पातळीवरून सिंचनाची कामे योग्य पद्धतीने होत नसल्याने सिंचन क्षेत्र वाढण्यास ब्रेक लागत आलेला आहे. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडतोे. त्यामुळे मार्च नंतर अनेक गावांना टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. गेल्या वर्षी भिषण दुष्काळ पडला होता. जिल्ह्यातल्या सर्वच गावांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करावा लागला होता. भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवू नये यासाठी गावपातळीवर विहिर खोदण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी प्रस्ताव मागवण्यात आले होते. या प्रसावातील ४४० विहिरींना मंजूरी देण्यात आली. एका विहिरीसाठी ६ लाख ९८ हजार रूपये खर्च येणार आहे. ४४० विहिरींमुळे त्या-त्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यास नक्कीच मदत होवू शकते.
कोणत्या तालुक्याला
किती विहिरी
धारूर २२, केज ५८, वडवणी ३५, गेवराई ८३, पाटोदा ११, माजलगाव ९, शिरूर २८, बीड ८७, आष्टी १०७
बोगसपणाला आळा
बसायला हवा
शासनाच्या योजना म्हटलं की गावपातळीवरील पुढारी योजनेचं मातेर करून योजना स्वत:च्या घशात घालत असतात. आजपर्यंत पाणी टंचाईवर कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात आला. तरीही बीड जिल्ह्यामध्ये गावपातळीवर पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. आता नवीन विहिरी खोदल्या जाणार आहेत. त्यात भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यायला हवी. आजपर्यंत ज्या विहिरींना मंजूरी देण्यात आली त्याचे खोदकाम करण्यात आले. त्यातील बहुतांश विहिरी बोगस दाखवून सरपंचाने बील उचललेले आहेत. ४४० विहिरीमध्येही अशाच पद्धतीचा भ्रष्टाचार होवू नये याबाबत जिल्हाधिकार्यांसह सीईओने सतर्कता बाळगायला हवी.
बीड तालुक्यातील विहिरी मंजूर गावांची नावे
घाटसावळी, पोखरी, मैंदा, मौज, मानकुरवाडी, समनापूर, बेलवाडी, लोणी शहाजानपूर, मस्सेवाडी, पिंपळगाव घाट, रूईगव्हाण, पालसिंगण, धावज्याचीवाडी, आंदापुरीघाट, मांजरसुंबा, पांढर्याचीवाडी, आंबिलवडगाव, तांदळवाडी घाट, सावरगावघाट, कोळवाडी, नेकनूर, सफेपुर, मौजवाडी, घोडका राजुरी, दगडी शहाजानपूर, बेलुरा, साक्षाळपिंप्री, तांदळवाडी हवेली, सौंदाना, पिंपरगव्हाण, बेलगाव, चर्हाटा, भाळवण, तळेगाव, बेलखंडी, मस्सेवाडी, लिंबागणेश, पिंपळवाडी, नाळवंडी, ईट, बेलवाडी, लिंबारूईदेवी, बर्हाणपुर, पिंपळनेर, रंगनाथवाडी, वडगावगुंदा, बाभळवाडी, पिंपळादेवी, लोणी शहाजानपूर, महाजनवाडी, केसापूरी परभणी, चिंचोली माळी, लोणीघाट, बोरदेवी, निर्मळवाडी, अंजनवती, कदमवाडी, करचुंडी, वडगाव, कळसंबर, माळापुरी, खुर्देवाडी, येळंबघाट, कानडीघाट, माळेवाडी, उमरद खालसा, बोरखेड, वाडवण, गवळवाडी, काकडहिरा, पोखरी मैंदा, लक्ष्मीआईतांडा, भंडारवाडी, पाटेगाव, मुगगाव, भाळवणी, कर्हाळवाडी, वाकनाथपुर, मंजेरी हवेली, मोरगाव, सोमनाथवाडी, पिंपरनई, नेकनूर, वैतागवाडी, पिंपळगाव मोची, या गावामध्ये विहिरी खोदण्यात येणार असून काही विहिरी बुडीत क्षेत्र असलेल्या भागात खोदण्यात येणार तर काही विहिरी इतर ठिकाणी खोदण्यात येणार आहेत.
