Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चौकीवर नियुक्त कर्मचारी गेले कुठे? नाक्यावरील चौकी बनली फक्त शोभेची वास्तू



  बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे अंतर्गत बार्शी नाका चौक व परिसर येतो. सदर चौकाचा भाग अत्यंत वर्दळीचा व रहदारीचा आहे. या भागात वेळोवेळी वाहनांची गर्दीच गर्दी असते. पुर्वेकडून परळी, वडवणी यांसारख्या तालुक्यांकडून कित्येक वाहने ये-जा करत असतात. तर दक्षिणेकडून सोलापूर, लातूर, केज, अंबाजोगाई या भागातून बीड शहराकडे वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे बार्शी नाका चौकात मोठी गर्दी होत असते. ही गर्दी हटवून वाहनांची सुरळीत वाटचाल लावण्याची कामे कोणाची? असा सवाल निर्माण होत आहे. या भागात रस्त्यावर वेळोवेळी अपघात घडत असतात. अपघाताचे प्रमाणही या भागात मोठ्या प्रमाणात आहेत.

हे पण वाचा : - विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश
 यावेळी पोलिस चौकी जर सुरू असेल तर तात्काळ पोलिस कर्मचारी हजर होतील. मात्र पोलिस चौकीच बंद असल्याने कोणते पोलिस घटनास्थळी हजर होतील तसेच गुन्हेगारावर कोणता वचक राहिल. अवैध धंद्यांचा सुळसुळाट, गुंडागर्दी अशा विविध गुन्हेगारीवर अंकुश लावावा यासाठी या भागाचा विचार करूनच बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाणे अंतर्गत बार्शी नाक्यावरील चौकात एका बाजूला पोलिस चौकी निर्माण केली. मात्र सदर पोलिस चौकी काही महिन्यापासून बंदच असल्याने त्या भागात गुन्हेगारीच्या प्रमााणात वाढ व अवैध धंद्यांना वेग आलेला आहे. एखाद्यावर गुन्हा दाखल अथवा तक्रार सांगायची असेल तर चौकी कायमची बंद असल्याने त्यांना पेठ बीड पोलिस ठाणे गाठावे लागते. मात्र बार्शी नाक्यावरील पोलिस चौकी कित्येक दिवसापासून का बंद असते? सदर चौकीवर नियुक्त केलेले कर्मचारी कोणते आहेत व ते कोठे गेले आहेत? चौकीवर का येत नाहीत? का थांबत नाहीत? चौकी का उघडी केली जात नाही? असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.
या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
हे पण वाचा :- संगमनेर:- रिंकू राजगुरु शुक्रवारी येतेय संगमनेरमध्ये !
परिसरात गेल्या काही दिवसापूर्वी सतत बार्शी नाक्यावरील पोलिस चौकी सुरू असायची त्यामुळे परिसरात असणारा अवैध धंद्याचा सुळसुळाट तसेच गुंडा गर्दीच्या प्रमाणातही घट झालेली होती. मात्र आता ही पोलिस चौकी सतत बंदच्या अवस्थेत दिसत असल्याने पोलिसांचा वचक कमी झाल्याचा दिसतोे. त्यामुळे अवैध मटका, गुटखा, अवैध दारू, गुंडागर्दी असे प्रकार तेजित आल्याचे दिसून येतात. यासाठी पोलिस चौकी खुली ठेवणे व गुन्हेगारावर वचक बसवणे गरजेचे आहे. यासाठी पेठ बीड पोलिस ठाण्याने पोलिस चौकी वेळोवेळी खुली ठेवणे गरजेचे आहे.
हे पण वाचा : - अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या '' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला
२४ तास पोलिस चौकी खुली असावी - नागरिक
सदरील पोलिस चौकी व परिसर अत्यंत रहदारीचा व वर्दळीचा आणि वाहनांच्या गर्दीचा असल्याने या भागातील महिला व मुली रात्रीच्या वेळीही निर्भयपणे या रस्त्यावर वावरण्याससाठी व पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक होण्यासाठी या भागातील पोलिच चौकी २४ तास खुली असावी. जेणेकरून एखाद्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिसांना विलंब होणार नाही असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे.



beedreporter.net