Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चालू घडामोडी (११ जानेवारी २०२०) - Chalu Ghadamodi Today Current Affairs In Marathi 2020


शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार 15 हजार रुपये :

  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे.
  • तर या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • तसेच या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
  • जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू :


  • पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.
  • तर हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.
  • तसेच या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे सोनेरी यश :


  • ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शुक्रवारी गुवाहाटी येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
  • पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
  • महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक प्राप्त केले.
  • तर 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे हिने 40.80 गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोघींनीही दोरी आणि चेंडूच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या.
  • अस्मीने याआधी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये 5 सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. अस्मी ही ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थी असून ती पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी करणारा पहिला फलंदाज :


  • श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी करत 200 धावांचा टप्पा ओलांडला. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.
  • तर मधल्या फळीत मनिष पांडे, शार्दुल ठाकूर, विराट कोहली या फलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली.
  • विराटने पुण्याच्या गहुंजे मैदानावर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
  • मात्र या छोटेखानी खेळीतही विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट 250 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, लंकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटने एक धाव घेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
  • तर 196 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली असून यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडीत काढला.

दिनविशेष:
  • क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये झाला.
  • बुद्धिबळाच्या खेळात सन 1980 मध्ये नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून सन 1999 मध्ये जारी झाला होता.
  • सन 2001 मध्ये एस.पी. भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला होता.
  • गुलजारीलाल नंदा यांनी सन 1966 मध्ये भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
  • सन 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.