Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मन पाखरू - जगण्यात अनोखं पर्व आलं होतं ! चिमणी विना घरटं माझं परकं झालं होतं !!



मन पाखरू



जगण्यात अनोखं पर्व  आलं होतं !
चिमणी विना घरटं माझं परकं झालं होतं !!

पंखांस्वे बळ ही सारं हिरावून नेलं होतं
स्वप्न प्रवाहात सारं काही वाहून गेलं होतं.......!!

भिरभिरणाऱ्या पाखरागत
मन हे सारखं उडत होतं !!
निमंत्रण कळताक्षणी तिच्या लग्नाचं
आठवण तिची येताना मात्र रडत होतं.....!!

जीवनाच्या प्रत्येक वळणावर
नाव तिचं कोरायचं होतं !
नियतीनं डाव मांडला म्हणून
स्वप्नांनांशीच खेळत खेळत झुरायच होतं....!!

मनात सारखं कालवत होतं !
आठवांच्या वाटेवरी  चालवत होतं !
मनातलं ओठांवर येताक्षणी मात्र !
स्वतःशीच सतत बोलवत होतं
                   
                     कवी : प्रशांत पवार

सैराट आर्ची- कॉमेडी मराठी कविता